You are currently viewing भाजपा युवा सरचिटणीस नवलराज काळे यांच्या टीकेनंतर पालकमंत्री वैभववाडीत दाखल..

भाजपा युवा सरचिटणीस नवलराज काळे यांच्या टीकेनंतर पालकमंत्री वैभववाडीत दाखल..

लाक्षणिक उपोषणाचा इशारा देताच पालकमंत्री यांची रुग्णवाहिका देण्याची घोषणा

भाजपा युवा मोर्चा लोरे जिल्हा परिषद शक्ती केंद्रप्रमुख विवेक पवार यांचे वक्तव्य

वैभववाडी
वैभववाडी तालुक्यातील सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रातून आसपासची सर्व गावे(सडुरे, कुर्ली, शिराळे, अरुळे सांगुळवाडी नावळे) ही गावे आरोग्य सेवा घेत असतात त्यामुळे सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, व Covid 19 लसीकरण केंद्र चालू करण्याबाबत वैभववाडी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे नवलराज काळे यांनी मागणी केली होती तसेच त्यांनी या विषयासंदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा देखील केला होता.
सडूरे सारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी कायमस्वरूपी रुग्णवाहिका सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळावी अन्यथा एकदिवस लाक्षणिक उपोषणाचा नवलराज काळे यांनी इशारा दिला होता तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यास राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप काळे यांनी केला होता. तसेच पालकमंत्री यांनी कोरोना काळात वैभववाडी दौरा देखील केला नसल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या बातमीतून जनतेच्या निदर्शनात आणून दिले होते त्यास दोन दिवस उलटत नाहीत तोच पालकमंत्री उदय सामंत वैभववाडी तालुक्यात दाखल झाले. त्यामुळे हा योगायोग समजावा का..? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडी येथील पत्रकार परिषदेत सडूरे प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची घोषणा केली तसेच अन्य घोषणा त्यांनी यावेळी केल्या आहेत, त्या नुसत्या घोषणाच राहू नयेत त्यांची त्वरित अंमलबजावणी व्हावी असे मत भाजपा युवा मोर्चा लोरे जिल्हा परिषद शक्ती केंद्रप्रमुख विवेक पवार यांनी व्यक्त केले आहे. एक उपोषणाचा इशारा देताच पालकमंत्री वैभववाडीत आले हाच वैभववाडी तालुका भाजपा युवा मोर्चाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा