You are currently viewing झांट्ये उद्योग समुह तुळसचे पार्टनर श्रीकृष्ण मधुकर झांट्ये यांचे निधन

झांट्ये उद्योग समुह तुळसचे पार्टनर श्रीकृष्ण मधुकर झांट्ये यांचे निधन

वेंगुर्ले

झांट्ये उद्योग समुह तुळसचे पार्टनर श्रीकृष्ण मधुकर झांट्ये ५४ यांचे आज १५ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, दोन भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी, बहिण, भाओजी,भाचे असा परीवार आहे.
हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांचे मोठे बंधू सुधीर व हेमंत यांच्या बरोबरीने त्यांचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण तुळस गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा