You are currently viewing रशियाच्या स्फुटनिक व्ही कोरोना लसीची किंमत जाहीर…

रशियाच्या स्फुटनिक व्ही कोरोना लसीची किंमत जाहीर…

एका डोससाठी 995.40 रुपये मोजावे लागणार

रशियाची कोरोना व्हायरसवरील लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) ची भारतातील किंमत  जाहीर झाली आहे. रशियातून आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषधनिर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून मेक ईन इंडियाची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे. स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे.

ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लशीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.
रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे. यामुळे 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस उपलब्ध होणार आहे.

भारतात या लसीचे उत्पादन सुरु झाले की या लसीची किंमतही कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस देशभरातील बाजारांत उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले होते. भारतात सध्या देण्यात येत असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनपेक्षा रशियाची लस जास्त परिणामकारक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा