You are currently viewing मनसेच्या माध्यमातून कुडाळ येथे निर्जंतुकीकरण

मनसेच्या माध्यमातून कुडाळ येथे निर्जंतुकीकरण

आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या माध्यमातून कुडाळ शहर परिसर, सरकारी हॉस्पिटल, पोलिस स्टेशन अशा वर्दळीच्या ठिकाणी कोरोना चा पार्श्वभूमीवर sanitation (निर्जंतुकीकरण)करण्यात आले..
आज सिंधुदुर्ग, प्रामुख्याने कुडाळ हे जास्त पॉजिटिव्ह  रुग्ण आढळण्याचे ठिकाण बनले आहे..
नगरपंचायत, स्थानिक आमदार , प्रशासनाच्या यंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे, रुग्ण संख्येला थांबवण्यासाठी साठी कुठलीही ठोस पावले या वरील मंडळींनी उचललेली नाहीत, त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम मनसेने हाती घेतला.. जनता कर्फ्यू लावून एका प्रकारे प्रशासनाने आपले हात वर केले.
या जनता कर्फ्यू मध्ये कुठलेही ठोस पावले प्रशासनाने उचलले नसल्यामुळे स्थानिक लोकांचे तसेच व्यापाऱ्यांची अतोनात हाल झाले, भविष्यात जवळपासच्या छोट्या बाजारपेठा या ठिकाणी सुद्धा sanitation (निर्जंतुकीकरण) करण्याचा मानस मनसेचा आहे..
आजच्या उपक्रमाची सुरुवात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते जिजामाता चौक येथे श्रीफळ वाढवून करण्यात आली.. याप्रसंगी जांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला ते मनसे एस.टी. कामगार सेना राज्य उपाध्यक्ष श्री बनी नाडकर्णी. कुडाळ शहर अध्यक्ष सिद्धेश खुठाळे, उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, कुडाळ शहर सचिव रमा नाईक, प्रथमेश धुरी, सिद्धांत बांदेकर अनिकेत घाडी, समीर वाळके आदी उपस्थित होते..
सदर कार्यक्रमास कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाठ यांनी शुभेच्छा देऊन उपक्रमाचे कौतुक केले..

प्रतिक्रिया व्यक्त करा