You are currently viewing कुडाळ शहरातील सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद रामचंद्र जाधव यांचे निधन..

कुडाळ शहरातील सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद रामचंद्र जाधव यांचे निधन..

कुडाळ :

कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद रामचंद्र जाधव (वय ५९) यांचे ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान निधन झाले. कुडाळ नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सरोज जाधव यांचे ते पती होत.

 

कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद जाधव हे गेले चार दिवस आजारी होते. त्यांना कुडाळ येथील महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

 

ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. तसेच २०२० मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी वैभववाडी, घावनळे, वालावल या प्राथमिक शाळांमध्ये आपली सेवा बजावली. ते भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + seven =