You are currently viewing पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी 

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सांमत यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.

        शुक्रवार दि. 14 मे रोजी सकाळी 8 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने वैभववाडीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. स्थळ- तहसिलदार कार्यालय, वैभववाडी. सकाळी 11.00 वाजता वैभववाडी येथून मोटारीने देवगडकडे प्रयाण.

दुपारी 12.15 वाजता देवगड येथे आगमण व कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरण संदर्भात आढावा बैठक. स्थळ- तहसिलदार कार्यालय, देवगड. दुपारी 1.15 वाजता देवगड येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह ओरोस येथे आगमण व राखीव. सायंकाळी 4.00 वाजता जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नरडवे, ता. कणकवली येथील धरणग्रस्तांच्या विविध मागण्यासंदर्भात आयोजित बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग.

सायंकाळी 5.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर मेडीकल ऑक्सिजन पुरवठा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, कडक निर्बंध व लसीकरणाबाबत आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. सायंकाळी 5.30 वाजता मान्सून पूर्वतयारी व संभाव्य चक्रीवादळ ‘ताउते’ च्या अनुषंगाने आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. सायंकाळी 6.00 वाजता पत्रकार परिषद. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. सायंकाळी सोईनुसार सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

प्रतिक्रिया व्यक्त करा