You are currently viewing आरटीपीसीआर चाचणी अहवाल द्यायला आरोग्य विभागाची दिरंगाई

आरटीपीसीआर चाचणी अहवाल द्यायला आरोग्य विभागाची दिरंगाई

न्हावेली
एकीकडे गोवा सरकारने गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केलेला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व पोलीस लाठीवर कामानिमित्त रोज ये-जा करणाऱ्या नोकरदार वर्गाची चाचणी सुरु केली आहे. मात्र, या चाचणींचे अहवाल देण्यासाठी आरोग्यविभाग दिरंगाई करत असल्याने त्याचा फटका युवकांना बसत आहे.
न्हावेलीतील एका युवकाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित युवकाने चार दिवसापूर्वी चेकपोस्टवर चाचणी केली होती. त्याचा रॅपिड टेस्टचा अहवाल ही निगेटिव्ह आला होता. मात्र, अद्याप त्याला चाचणी अहवाल प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याने त्याला गोव्यात जाणे मुश्किल बनले आहे. त्याने चाचणी केली होती तिथून सांगण्यात आले की आरोग्य केंद्राशी संपर्क करा. त्याची चाचपणी करण्यासाठी आरोग्य केंद्राशी संपर्क केला असता अहवाल प्रमाणपत्रासाठी सात दिवस लागत असल्याचे सांगण्यात आले. गोव्यात प्रवेश करण्यासाठी ७२ तासातील अहवाल द्यावा लागतो मात्र चाचणी अहवाल प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा ते सात दिवस लागत असतील तर युवकांनी काय करावे असा संतप्त सवाल या युवकाने उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + nineteen =