You are currently viewing दिपक केसरकर यांनी दिला दिलासा…

दिपक केसरकर यांनी दिला दिलासा…

ग्रामीण भागात होणार नियोजनबद्ध लसीकरण

सावंतवाडी

लसीकरणासाठी होणारी गैरसोय लक्षात घेत सबसेंटरला लसीकरण केल जाणार अस माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यात म्हापण, परुळे, आडाळी, आडेली, वेतुरा, तुळस, उभादांडा येथील पिएचसी, सबसेंटरमध्ये लसीकरण केल जाणर आहे.

तर सावंतवाडी तालुक्यात कोलगाव, आंबोली, चौकुळ इथ एक एक वेळा, चौकुळ इथ उद्या लसीकरण करण्यात येणार आहे. बांदा, रोणापाल या दोन ठिकाणी, तर निरवडे येथील लसीकरण केंद्र माजगाव इथ करण्याचा सूचना आमदार दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. उद्या हे केंद्र सुरु केल जाईल. त्यामुळे माजगाव-चराठा यांना सावंतवाडीत याव लागणार नाही. सातार्डा सेंटर देखील सुरु करण्याचा विचार सुरु आहे.

दोडामार्ग तालुक्यात भेडशी, उसप, मोरगाव,आयी, तळकट, विलवडे आदि ठिकाणी लसीकरण केल जाणर आहे. अशी माहिती माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळालाय.

प्रतिक्रिया व्यक्त करा