You are currently viewing जिल्ह्यात १५ व १६ रोजी वादळ सदृश्य पावसाची शक्यता

जिल्ह्यात १५ व १६ रोजी वादळ सदृश्य पावसाची शक्यता

सिंधुदुर्गनगरी

भारतीय हवामान विभागाने  दिलेल्या माहितीनुसार पूर्वमध्य अरबी समुद्रात शुक्रवार दि. १४ ते रविवार दि. १६ मे २०२१ रोजी वादळ सदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

जिल्ह्यात शुक्रवार दिनांक 14 मे ते शनिवार दिनांक 15 मे 2021 रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सुमारे 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

            त्याचप्रमाणे रविवार दिनांक 16 मे 2021 रोजी महाराष्ट्र व गोवा किनाऱ्यावर 40, 45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत सर्व मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सुचना दिल्या असून, समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधानतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. त्यामुळे  शनिवार दिनांक 15 व रविवार 16 मे 2021 रोजी या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी न जाणाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी या अनुषंगाने योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा