सावंतवाडी :
आरोंदा बायपास रस्त्याच्या कडेला गेल्या पंधरा दिवसांपासून बायोमेडीकल वेस्टच्या सीरिंज, सूया, ईंजेक्शन, रिकामी झालेल्या बॉटल, त्यात भर म्हणून बियरच्या रिकामी झालेल्या बाटल्या, त्यात अजुनही कचरा टाकणे चालूच आहे. त्या पासून काही अंतरावर सिमेंटच्या पिशव्यांमध्ये भरून उघड्यावर घाणीचा कचरा टाकण्यात आला आहे.
सध्या कोरोना सारख्या आजाराची महामारी चालू आहे. काही अंतरावर लोक वस्ती आहे. कचऱ्यातील काही वस्तू लोकवस्तीत पशू प्राणी ओढुन नेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे रोगराई होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. असे असताना ग्रामपंचायत, नगरपालिका, प्रशासन यांचे या गोष्टी कडे दुर्लक्ष होत आहे असेच दिसून येते?