धान्य दुकान भेटीच्या वेळी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी आणला प्रकार उघडीस
वेंगुर्ले
एकीकडे गरिबांची काळजी असल्याचे दाखवायचे आणि दुसरी कडे असे निकृष्ट धान्य देऊन गरिबांची चेष्टा करायचीव ही दुटप्पी भूमिका राज्य सरकारने चालवली आहे. शिरोडा येथे सध्या रेशन दुकानांमध्ये लाभार्थी कुटुंबांना मोफत मिळत असलेली डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची वाटप केली जात आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने चौकशी करून तात्काळ अशा निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण थांबवावे. तसेच गोर गरीब कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून खाण्या योग्य धान्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.
शिरोडा धान्य दुकानांमध्ये वितरित करण्यात येत असलेली डाळ खराब आहे. अशा तक्रारी आल्याने सरपंच श्री उगवेकर यांनी राशन दुकानाना भेट दिली असता वितरित होणारी डाळ खराब असल्याचे दिसून आले. पाळीव प्राण्यांना खायला देताना ही अंगावर काटा येईल अशा दर्जाची ही डाळ सध्या राशन दुकान वर गरीब लाभार्थ्यांना मोफत म्हणून वाटप केले जात आहे. शनिवारी दुपारीच शिरोडा धान्य दुकानाची पाहणी करून पुरवठा विभागला या विषयी विचारले असता, त्यांच्याकडून सर्व गावात असेच धान्य आले आहे अस समजलं.
पाळीव प्राण्यांना ही असे धान्य खायला देताना अंगावर काटा यावा अशी ही डाळ आहे.मोफत धान्य च्या नावाखाली गरजू गरिबांची क्रूर चेष्टा राज्य शासनाकडून चालू आहे. याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करतो असे श्री. उगवेकर यांनी सांगितले