सावंतवाडी:
३० एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात परत एकदा लाॅकडाउन करण्यात आले. सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला व किराणा माल खरेदी करण्यास परवानगी होती.
त्याप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांनी दि. ५ मे रोजी घोषणा केली, कि दि. ६ मे पासून जनता कर्फ्यु लावण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तमाम जनतेने ज्यांना दोन वेळेच जेवण भेटाव यासाठी जी सामान्य गरीब लोकं कोरोना साखळी तोडण्यासाठी सरकारला सपोर्ट करताहेत. असं असताना पालकमंत्री यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असलेली रूग्ण संख्या यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात. रॅपिड टेस्ट जास्त प्रमाणात करण्यात याव्यात त्यामुळे विषाणू संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होईल. त्याचप्रमाणे लसींचा पुरेपूर साठा उपलब्ध करून मोठ्या प्रमाणात लसीकरण करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला सुरक्षित करावं…
सावंतवाडी शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. जर सावंतवाडी तालुक्यातील गेल्या काही दिवसांचा कोरोना रिपोर्ट बघितला असता. असं लक्षात येईल, कि दि. ५ मे रोजी तालुक्यातील रुग्णसंख्या ही ४९ एवढी होती. तर दि.६ मे रोजी लाॅकडाऊन लावल्यानंतर ही संख्या ६२, दि. ७ मे रोजी ९२ तर दि. ८ मे रोजी दिवसभरात तब्बल २०४ रुग्णसंख्या वाढलेली आहे तर यावर काहीतरी उपाययोजना करण्याच्या सूचना सावंतवाडी नगरपालिकेला द्याव्यात
परत लॅकडाऊन नको, त्याजागी आरोग्य यंत्रणेला पुरेपूर लसींचा साठा उपलब्ध करून द्या. अशीच रुग्णसंख्या वाढत राहीली तर परत लाॅकडाऊन करावे लागेल आणि अश्या परिस्थितीत ज्यांच पोट हातावर आहे त्याचे खुप हाल होतील. त्यामुळे तातडीने उपाययोजना वाढवाव्यात.