You are currently viewing पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते एक काम जबाबदारीने केलं ते दाखवा

पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणते एक काम जबाबदारीने केलं ते दाखवा

45 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी नाकारली त्यात काय एवढं मोठं तो तर सवयीचा गुणधर्म

आल अंगावर की ढकललं केंद्रावर

ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा पुरवण्यास राज्य सरकार निष्क्रिय

भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज विजयसिंह काळे

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री फक्त घोषणा वरती घोषणा करीत आहेत तर त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. राज्यसरकार या बाबत कोणती ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. रिक्त जागा भरली नसल्यामुळे काही ठिकाणी आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन निर्णयाप्रमाणे गाव निहाय स्थापन करण्यात आलेल्या ग्राम कृती दल समिती तर दुसरी ग्राम स- नियत्रंण समिती त्यांच्या सभासदांना राज्य सरकारकडून संरक्षण देण्यात आले नाही. जीवाचं रान करून सरपंच सदस्य आपापल्या भागातील जनतेला सेवा पुरवीत आहेत यांच्या सुरक्षितते बाबत कोणतीच ठोस निर्णय राज्य सरकारने न घेता सदर विषय देखील केंद्रावर ती ढकलला आहे.जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा एखाद्या वरती टीका करण्यास आपण पात्र असतो हे शिकवण्याची वेळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वरती आली आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सरपंच व सदस्य ग्रामपंचायत कमिटी यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर टाकला आहे. अत्यावश्यक सेवा देणारे जर सुरक्षित नसतील तर जनतेला सेवा कश्या पुरवतील. संचारबंदी झाल्यापासून वैभववाडी तालुक्यात पालकमंत्री भेट पण दिली नाहीत.राज्य सरकार आपल्या जबाबदाऱ्या पार पडताना दिसून येत नाही. वैभववाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे(वैभववाडी) इमारतीचे काम अद्याप सुरू का झाले नाही…? मंजुरी ची फाईल राज्य सरकारच्या टेबलवर ती धूळ खात पडली आहे. ही जबाबदारी कोणाची, जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात आरोग्य,सेवक सेविका, वैद्यकीय अधिकारी परिचारक पदे रिक्त आहे ही पदे भरती करण्याची जबाबदारी कोणाची…..? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्य सेवक,सेविका नाहीत याला जबाबदार कोण….? राज्य सरकारचा या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन काम पूर्ण करून घेण्याचे राज्य सरकारचे व मंत्री महोदय यांचे कर्तव्य होतं पण ते राज्य सरकारने अद्याप देखील केलेले नाही अशा सरकारच्या मंत्रिमंडळात असणारे मंत्री महोदय त्यांच्याकडून 45 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत जबाबदारी नाकारण्याचे वक्तव्य झाले. त्यांना माझा असा सवाल आहे की जिल्ह्यात एक तरी काम दाखवा जे पालकमंत्र्यांनी जबाबदारीने पार पाडले. जबाबदारीनी कामे होणे ही अपेक्षा ठेवणेच मुळात चूक आहे. त्यामुळे त्यांनी स्वभावाप्रमाणे हे वक्तव्य केले अशी टीका वैभववाडी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस नवलराज काळे यांनी पालकमंत्र्यांवर केली आहे. जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील लसीकरणाचे तीन-तेरा वाजले आहेत. एकीकडे जिल्ह्यात कडक लॉकडॉऊन जाहीर केला आहे. तर लसीकरण तालुका स्तरावरती चालू आहे. अशा परिस्थितीत गाड्या देखील बंद आहेत लसीकरण याचा लाभ नेमका कसा घ्यावा हा ग्रामस्थां पुढील प्रश्न आहे. यावरती सर्वांनी एकत्र बसून उपाययोजना करणे गरजेचे असताना जबाबदार व्यक्तींकडून अशा टीका होणे हे निंदनीय आहे आम्ही सर्व याचा निषेध करतो. तसेच राज्य सरकार ग्रामीण भागात सेवा पुरवण्यास निष्क्रिय व त्या निष्क्रियतेचे खापर केंद्र सरकार वरती फोडण्याचं काम जिल्ह्याचे पालकमंत्री करीत आहेत.असे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. राज्य सरकारने ग्रामीण भागाला गृहीत धरून चालू नये. ग्रामीण भागात योग्य सुविधा पूरवा तसेच कोरोना लढ्यात काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करा. त्यांच्या समस्यांवर ती बोला टीका टिपणी करत आपली राजकीय पोळी भाजू नका अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता आपल्यास माफ करणार नाही. असा सूचक इशारा महाविकास आघाडीच्या सरकारला वैभववाडी तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज विजयसिंह काळे यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 10 =