You are currently viewing सिंधुदुर्ग च्या सीईओ पदी मकरंद देशमुख यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग च्या सीईओ पदी मकरंद देशमुख यांची नियुक्ती

सिंधुदुर्गचे नवनियुक्त सीईओ मकरंद देशमुख यांनी स्वीकारला पदभार

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. सेवेच्या यापूर्वीच्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या पदावर सुद्धा चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची गोंदिया जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागी मंत्रालयात सचिवालयात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या मकरंद देशमुख यांची शासनाने नियुक्ती केली होती. त्यानंतर नायर यांनी आपला पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कापडणीस यांच्याकडे दिला होता. आज देशमुख यांनी हजर होत हा कार्यभार स्वीकारला आहे.

मकरंद देशमुख हे यापूर्वी २००४ ते २००६ या कालावधीत कणकवली प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी प्रांताधिकारी म्हणून चांगले काम केले होते. त्यांच्या काळात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे २००५ मध्ये झालेल्या पूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मालवण – कणकवली विधानसभा निवडणुकीचे ते निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यांना कणकवली, मालवण, देवगड आणि वैभववाडी या चार तालुक्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कारभार हाकताना त्यांना फायद्याचे ठरणार आहे.

*संवाद मीडिया*

📢📢📢📢📢📢📢
*अशी ॲाफर पुन्हा नाही*
*🔵फ्री आरटीओ टॅक्स…!!!*🔵

होय..आपण योग्य तेच वाचलेत..

*टाटा अल्ट्रोज़ , टियागो आणि टिगोर करिता आरटीओ टॅक्स पूर्णत: मोफत…*

देशातील सर्वात सेफ आणि
ग्लोबल एन-कॅप सेफ्टी रेटिंग ४ आणि ५ स्टार ने परिपूर्ण एकमेव कार्स आता अधिक सवलती सह उपलब्ध..

*त्वरा करा…*
*ॲाफर केवळ हजर स्टॉक वर उपलब्ध..*
नियम व अटी लागु

आपल्या जुन्या कार चे सर्वोत्तम एवेल्यूएशन्स , १००% ऑन रोड फ़ाइनैंस , टेस्ट ड्राइव आणि डेमो करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा.

चला आजच सहभागी होऊ या
*🇮🇳🇮🇳संपूर्ण स्वदेशी अभियान*🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*शासकिय कर्मचारी आणि शासकीय शिक्षक* करीता अतिरिक्त कॉर्पोरेट ऑफर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/124902/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा