फोंडा माळावरची बैठक दाजीपूर जंगलात हलवली.
दिवाळी पर्यंत जुगाराच्या बैठका बंद ठेवण्याचे निर्देश दिले असतानाच, फोंडा येथे सुरू असलेली मुख्य सूत्रधार रांगो याची जुगाराची बैठक मात्र दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत फोंडा येथील एसटी स्टँड च्या मागील माळरानावर झाली. फोंड्यातील बैठक मॅनेज करणारा रांगो हा दात पडक्या आप्पा आणि पारावरच्या विठ्ठलाचा मॅनेजर. पारावरच्या विठ्ठलाची आणि दात पडक्या आप्पाची जुगाराची बैठक, खाकीवर्दी ला मॅनेज करणे, भागविणे सर्वकाही रांगो करत असतो. तोच जुगाराच्या बैठकीचा मुख्य सूत्रधार आहे. फोंडा येथील खाकी वर्दीतील शिलेदार याने जुगाऱ्यांना चार दिवस थांबा….मग बसा” असे सांगत आपला पाठिंबा दिला.
फोंडा येथे झालेल्या जुगाराच्या बैठकीत खेळी चे पैसे गेले. त्यामुळे खेळी हात पाय आपटत बाहेर पडले. कुणाला एन्ट्री सुद्धा मिळाली नाही.