You are currently viewing वैभववाडीत राखीव लसीकरण कोट्यामध्ये बाहेरील व्यक्तींचा समावेश

वैभववाडीत राखीव लसीकरण कोट्यामध्ये बाहेरील व्यक्तींचा समावेश

ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करून घेतली जातेय लस

वैभववाडी

तालुक्यात राखीव असणाऱ्या लसीकरण कोट्यामध्ये बाहेरील व्यक्तींचा समावेश असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आ. नितेश राणे यांच्या सुचनेनुसार भाजपा शिष्टमंडळाने वैभववाडी तहसिलदार रामदास झळके यांना लसीकरणातील अनागोंदी कारभाराबाबत निवेदन दिले आहे.
तालुक्यात राखीव असणाऱ्या लसीकरण कोट्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड येथील व्यक्ती अॉनलाईन पध्दतीने नोंदणी करून लस घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना लसीच्या तुटवड्यामुळे घरी परतावे लागत आहे. याप्रकरणी आ. नितेश राणे यांच्या सुचनेनुसार भाजपा पदाधिकारी तथा माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, संजय सावंत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर कदम, अंकित सावंत, तेजस आंबेकर, संतोष पाटील, संतोष कुडाळकर, नितीन महाडीक, संतोष महाडीक, प्रकाश पाटील, शंकर कोकरे आदी शिष्टमंडळाने वैभववाडी तहसिलदार रामदास झळके यांना निवेदन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा