You are currently viewing फोंड्यात बसली जुगाराची मैफिल…

फोंड्यात बसली जुगाराची मैफिल…

रांगो मुख्य सूत्रधार..

 

     कोरोनाच्या संकटात जुगाराला पेव फुटले आहेत. जिल्ह्यात जिकडे तिकडे जुगाराच्या बैठका बसत आहेत आणि या जुगाराच्या बैठकांना आशीर्वाद आहे तो खाकितील शिलेदारांचा. *कणकवली तालुक्यातील फोंडा* येथे जुगाराची मैफिल बसली असून रांगो या मैफिलीचा मुख्य सूत्रधार आहे. *खाकी वर्दीतील बन्या* मैफिल बसली की हफ्ता गोळा करतो. 

फोंडा येथे ही बैठक दुपारी साडे बारा वाजता सुरू होऊन चार वाजता बंद होते व पुन्हा रात्री आठ वाजता सुरू होते ती मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालते. फोंड्यातील जुगाराच्या मैफिलीत पारावरच्या विठ्ठलाची ३० पैसे तक्षीम….दात पडक्या आप्पाची ३० पैसे तक्षीम…तर टिटी १० पैसे….आणि इतरांची ३० पैसे तक्षीम असते, अशाप्रकारे एकूण एक रुपयांची तक्षीम होते.

काल दुपारी मुख्य सूत्रधार रांगोला मिळाले होते तब्बल ५४०००/-रुपये, रात्रीच्या बैठकीत मिळाले तब्बल ८५०००/- रुपये. फोंडयात बसणारी ही मैफिल सकाळच्या सत्रात फोंडा एसटी बस स्टँड च्या मागे माळावर बैठक बसते, तर रात्री सुरू होणारी बैठक एसटी स्टँड च्या समोर बंद घरात बसते. घर मालक मुंबईत राहत असल्याने त्यांच्या घराच्या माडीवर बंद खोलीला बाहेरून लॉक घालून बिनधास्तपणे ही जुगाराची मैफिल सजते. खाकी वर्दीतील बनजारी नामक शिलेदाराच्या आशीर्वादावर अगदी बिनधास्त मैफिल बसत असून खाकितील या शिलेदारांना आणि त्यांच्या वरिष्ठांना जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाची कोणतीही फिकीर राहिलेली नाही. एकीकडे एखादा पोलीस कोरोनाग्रस्त झाल्यावर ओरड मारणारे खाकीचे शिलेदार शेकडो जुगाऱ्यांच्या बैठकांना केवळ पैशासाठी पाठबळ देतात, परंतु कोरोना झाल्यावर हाच पैसा उपचारासाठी देखील पूरत नाही हे सत्य आहे.

खाकीच्या वरिष्ठांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता जुगाराच्या बैठकांवर कारवाई करणे आणि त्यांच्याकडून हफ्ते वसुली करणाऱ्या आपल्या शिलेदारांवर वचक बसविणे गरजेचे आहे, अन्यथा जुगाराच्या माध्यमातून रोज नवनवीन कोरोना रुग्ण जन्मास येतील यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा