दिखावे व फोटोशूट व्यतिरिक्त मागील दोन वर्षात प्रत्यक्षात कोरोना विळख्यातुन सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले ते स्पष्ट करावे
सत्तेतील आमदारांनी स्वतःच नाकर्तेपण लपवण्यासाठी जनतेवर लादलेल्या तुघलकी “कर्फ्युला” मनसेचा पाठिंबा नाही…..मात्र प्रशासनाला सर्वोत्तपरी सहकार्य ; कुणाल किनळेकर जिल्हाध्यक्ष मनवीसे.
मतदार संघातील रस्ते विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणला म्हणून आकडे जाहीर करणारे आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत आठ महिन्यापूर्वी दोन महिन्यात महिला व बाल रुग्णालय सुरू करतो म्हणून सांगून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी पाच कोटी रुपये आणण्यासाठी कमी का पडले याचे उत्तर जनता मागत आहे.
एकीकडे मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री म्हणतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे व भविष्यात तीसरी लाट येईल. मग असे असेल तर आमदार साहेब ठेकेदारांना पोसण्यासाठी कोट्यावधीचा निधी आणल्याची जी आपण घोषणा केलात त्यातील काही लाख रुपये जर वेळेत या कुडाळ मधील महिला बाल रुग्णालयासाठी खर्च केला असता तर आज त्या ठिकाणी किमान 400 कोरोना रुग्णांची त्या ठिकाणी योग्य सुविधा झाली असती हे आपण विसरून कसं चालेल..!
मा. आमदार साहेब आपण नुसतेच आपल्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन पाहणी दौरे आरोग्य यंत्रणेला मनःस्ताप देण्यापेक्षा त्या कर्मचाऱ्यांना योग्य सोयी सुविधा,मेडिसिन साहित्य पुरेशा प्रमाणात देण्यासाठी आपली ताकत लावा.तसेच जनता कर्फ्युच्या आडून प्रशासनामार्फत सामान्य जनतेच्या पोटावर लाथ मारण्यापेक्षा आपल्या सरकारकडून लसीकरणासाठी पुरेसा लसींचा पुरवठा,रेमडिसीवर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजन, चाचणी किट आदी बाबींचा पुरवठा देऊन नियोजनबद्ध कारभार हाकत जनतेला या महामारीच्या काळात सहकार्य करावे असे मनसेच्या वतीने आपणांस विनंती करीत आहोत असे आवाहन मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.