You are currently viewing कोकणात यंदाच्या पर्यटन हंगामातही कोट्यावधीची उलाढाल ठप्प…

कोकणात यंदाच्या पर्यटन हंगामातही कोट्यावधीची उलाढाल ठप्प…

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णांमुळे शिथिलता लांबणीवर पडणार हे निश्‍चित आहे. त्याचा परिणाम पर्यटन हंगामावर झाला आहे. कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली असून मे महिन्याचा हंगाम पूर्ण वाया जाणार आहे. पावसाळ्यातही तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असल्याने पर्यटन व्यवसाय सुरू होण्यासाठी दिवाळीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राज्य शासनाने  संचारबंदी लागू केली असून जिल्हाबंदीही  कडक केली आहे. याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे.

एप्रिल, मे या दोन महिन्यात कोकणातील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल असतात. कोटीच्या घरात उलाढाल होते. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून असतो. यंदा ऐन हंगामाच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाल्याने गतवर्षीप्रमाणेच अवस्था झाली आहे. मार्चच्या अखेरीस संचारबंदी लागू झाली. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात बंदी उठली आणि पर्यटन व्यवसाय सुरू झाला. ओघ वाढत असतानाच पुन्हा बंदी आली. अनेक लॉजिंग, हॉटेल व्यावसायिकांनी कर्ज काढून दुरुस्त्या केल्या. ते कर्ज फेडण्यासाठी काय करायचे? हा प्रश्‍न पडला आहे.

कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीस ओसरेल, असा अंदाज आहे. तोपर्यंत पर्यटन हंगाम संपलेला असणार. त्यानंतर पावसाळा सुरू होतो. त्यामुळे पर्यटन हंगामासाठी या व्यावसायिकांना दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसाळ्यात बंदी उठली तर संचारबंदीमुळे घरात अडकलेले काही पर्यटन फिरण्यासाठी बाहेर पडू शकतात. त्याचा फायदा घेण्यासाठी व्यावसायिकांना वेगवेगळा फंडा राबवावा लागणार आहे.

“संचारबंदीमुळे पर्यटक येत नाहीत. याचा परिणाम होत आहे. बंदी उठण्याची प्रतीक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा