You are currently viewing जिल्ह्यातील सर्व आय. टी. आय. शिक्षकांनी मनसेचे मानले आभार…

जिल्ह्यातील सर्व आय. टी. आय. शिक्षकांनी मनसेचे मानले आभार…

कणकवली

दि. ०६ सिंधुदुर्गातील आय. टी. आय. मध्ये तासिकावर शिकवणाऱ्या शिक्षकांना पहिल्या लॉकडाउन कालावधीत शासन स्तरावरून मंजुर झालेले मानधन, जिल्हा आय. टी. आय. प्रिन्सिपलांच्या आडमुठ्या धोरणामुळे मार्च अखेर मागे गेले.

जिल्ह्यातील एका शिक्षकाला आकसापोटी सेवेतुन कमी केले. या सर्व शिक्षकांची मनसेकडे धाव घेत, संबंधितांच्या आडमुठेपणाचा पाढाच वाचला.

माजी आमदार जी. जी. उपरकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, संतोष सावंत यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. सावंतवाडी, ओरोस आय. टी. आय. ला धडक दिली.

सर्व शिक्षकांचे परत गेलेले पैसे मिळवुन देणार असल्याची ग्वाही दिली. कमी केलेल्या शिक्षकाला पुनःश रुजु केलं. इतर जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन शिकविण्याची परवानगी असताना, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र बंदी होती.

दया मेस्त्री यांनी मोबाईलद्वारे प्रिन्सिपल श्री. पाटील यांना संपर्क करून जाब विचारताच, ऑनलाईन शिकविण्याची परवानगी दिली.

जिल्ह्यातील सर्व आय. टी.आय. शिक्षकांनी मनसेचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा