सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोविड मुळे दान्ही पालक मृत्यू पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तकासाठी उपलब्ध असल्याची पोस्ट समाज माध्यमातून फिरत आहे. सदरची पोस्ट ही खोटी व बनावट आहे. असे मेसेजेस चुकीचे आहेत आणि अशा प्रकारे बालके दत्तकास दिली गेली तर ते बेकायदेशीर आहे. कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकास नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करण्यात यावा.
गांभिर्य लक्षात घेता, महिला व बाल विकास आयुक्तालय आणि save the children (India) या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या मदत कक्षात संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 8308992222,7400015518 या क्रमांकावर संपर्काची वेळ सकाळी 8.00 ते रात्री 8.00 वाजे पर्यंत आहे. अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.