You are currently viewing चक्री वादळाचा वैभववाडी तालुक्यातील अरुळे गावाला फटका

चक्री वादळाचा वैभववाडी तालुक्यातील अरुळे गावाला फटका

घरांचे व शौचालयाचे हजारोचे नुकसान

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात गुरुवारी सायंकाळी चक्री वादळाचा जोरदार फटका बसला. अरुळे गावातील घरे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या व्यक्ती ची नावे महादेव कर्ले, महेश बेळणेकर, अशोक सुभान रावराणे यांच्या घरांचे व शौचालयाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. वैभववाडी तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सर्वच गावांमध्ये जोरदार वादळी वारा व पाऊस पडला. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. वैभववाडीत सध्या आंबा हंगाम सुरू आहे.या हंगामात चार दिवसात तीन वेळा अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. वादळ वाऱ्यामुळे आंबा जमिनीवर पडून अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मे महिना हा आंब्याच्या हंगाम असतो अशावेळी आंब्याच्या फळांवर अवकाळी पाऊस पडल्यामुळे आंब्यांवर काळे डाग पडून आंबा कुजण्याची दाट शक्यता असते. त्याच प्रमाणे अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेतीच्या कामांमध्ये व्यत्यय आला आहे. पावसाळी हंगामासाठी गवत भरणे,लाकडे भरणे, शेतीची मशागत करणे इत्यादी कामे खोळंबली आहेत. वैभववाडी तालुक्यात आंबा विक्री करून अनेक शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. अवकाळी पडलेल्या पावसामुळे या वर्षी आंबा उत्पादनात मोठी घट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मे महिन्यामध्ये कडक ऊन पडत आहे. गेले चार दिवस ढगाळ वातावरण असून, उष्मा ही वाढलेला आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढग जमा झाले. बघता बघता वादळ वाऱ्यासह ढगांचा गडगडाट झाला. आकाशात विजा चमकत होत्या. सुमारे अर्धा तास वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =