सावरवाड ते सुकळवाड दरम्यान रस्ता खचला
ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कसाल ते मालवण या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर सावरवाड ते सुकळवाड दरम्यान साईड पट्टी लगतच अपघातास निमंत्रण ठरणारा रस्ता खचल्याने निकृष्ट दर्जाच्या या कामाची खातेनिहाय चौकशी व्हावी, संबंधित अभियंता यांची चौकशी होण्यासाठी गुणनियंत्रणका मार्फत कामाचा दर्जा तपासण्यात यावा अशी मागणी शिवगर्जना प्रतिष्ठान चे अध्यक्ष रोहन कदम यांनी केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्यांनी संवाद मीडियाचे लक्ष वेधले.