You are currently viewing नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा…

नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा…

मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांचे आदेश

मालवण

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. यामध्ये कोरोनाचा फैलाव मागील वर्षाचा कालावधीपेक्षा यावर्षी सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु त्या अनुषंगाने सिंधुदुर्गात राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. यामध्ये मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ काही प्रमाणात 11 वाजण्याच्या नंतर सुरू असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी मालवण पोलीस निरीक्षक, तहसीलदार, बीडीओ यांना विचारणा केली. व या विषयावर तातडीची बैठक घेण्यात आली. व प्रशासकीय अधिकारी वर्गाला नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या.

या अनुषंगाने पोलीस दुरक्षेत्र कट्टा येथे मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा व्यापारी संघाचे अरविंद नेवाळकर, कट्टा व्यापारी संघ अध्यक्ष प्रवीण गाड, ग्रामसेवक पी. डी. सरमळकर,पोलीस दुरक्षेत्र कट्टाचे रुक्मांगद मुंडे, योगेश सराफदार, संतोष पुटवाड तसेच कट्टा व्यापारी संघाचे सदस्य,सनियंत्रण समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक श्री. ओटवणेकर यांनी उपस्थित स्थानिक प्रशासकीय अधिकारी व व्यापारी बांधव यांना सूचना केल्या. शासनाने दिलेल्या नियमाचे व्यापारी बांधवांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन व्यापारी बांधवांना केले. तर नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकारी व स्थानिक पोलीस यांना दिले.

त्याचप्रमाणे कोणते नियम शासनाने घालून दिले आहेत त्याची माहिती गावातील सर्व ग्रामस्थांना व्हावी यासाठी वरची गुरामवाडी ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने संपूर्ण गावात ऑटोरिक्षा फिरवून स्पीकरच्या माध्यमातून संपूर्ण गावात शासनाच्या नियमांची जनजागृती केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा