You are currently viewing बांदा येथे उद्यापासून जनता कर्फ्यु लागू…

बांदा येथे उद्यापासून जनता कर्फ्यु लागू…

बांदा

उद्यापासून जनता कर्फ्यु जाहिर केल्याने आज बांदा बाजारपेठेमध्ये जिवनाआवश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी उसळली पोलीसांचे नियोजन नसल्याने आणि पोलीस दंड वसुलीत मशगुल झाल्याने ट्राफीकचे तिन तेरा वाजले.याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला पोलीसांच्या दंडात्मक कारवाईचा जनतेमधुन संताप व्यक्त करण्यात येत होता.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्यापासून जनता कर्फ्यु जाहिर करण्यात आल्याने आज दुकानदाराना वेळ देणे गरजेचे होते मात्र वेळवाढवुन नदिल्यामुळे आज बांदा बाजारपेठेमध्ये तुफान गर्दि उसळली .पोलीसांनी पार्किंगचे नियोजन केले नसल्याने‌ आणि नव्याने आलेला एक अधीकारी दमदाटी करत दंडात्मक कारवाई करण्यात मशगुल झाल्याने ट्राफीकचे तिन तेरा वाजले अखेर ट्राफीक काॅस्टेबल विजय जाधव यांनी बांदा शहरात खोळबलेल ट्राफीक सुरळीत केले.

कोरोनाच्या संकटाने व्यवसाईक,शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.आजची आर्थीक परिस्थीती डबगाईला आली असताना वहानधारकांनवर मास्क नलावणार्यांनवर दंडात्मक कारवाई करुन मेलेल्याना मारण्याचा प्रकार केला जात आहे.

कोरोनावर उपाय काढण्याऐवजी लोकांना संपवण्याचा हा प्रकार असाच राहिल्यास कोरोनापेक्षा महाभयंकर गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कोरोनाची लोकांमध्ये भीती निर्माण करण्यापेक्षा जनजागृती करणे लोकांना मदत करण्याची आज गरज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा