काळ्या फीती लाऊन तहसीलदारांना दिले निवेदन
वेंगुर्ला :
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमुल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरु केला असुन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खुन करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने काळ्या फीती लाऊन तहसीलदार प्रवीण कुमार लोकरे यांना निवेदन देण्यात आले.
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे .ठिक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमुल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत . भाजपा कार्यकर्त्यांचे खुन करणे , त्यांच्या घरांची जाळपोळ करणे , त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणांना आगी लावणे असे प्रकार घडत आहेत . ही लोकशाहीची हत्या आहे . त्याचा निषेधार्थ भाजपा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .
तालुक्यातील कोरोना महामारीची स्थीती लक्षात घेता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने निवेदन देण्यात आले . या निवेदनाच्या माध्यमातून कठीण काळात बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी संपुर्ण देशभरातील भाजपा कार्यकर्ते पाठीशी आहेत , तसेच गेल्या काही वर्षात पश्चिम बंगाल मध्ये तृणमुलच्या हिंसाचारात बळी पडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात आले .
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक , ता सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर व शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते .