बुधवार पेठेत मध्यरात्री महिलेचा चाकू भोसकून खून

बुधवार पेठेत मध्यरात्री महिलेचा चाकू भोसकून खून

पुणे

बुधवार पेठेत मध्यरात्री पोलीस हवालदाराचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वेश्‍यावस्तीत एका देहविक्रय करणाऱ्या महिलेचा चाकुने भोसकून खून करण्यात आला. राणी मुनाफ शेख (25,सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

फरासखाना पोलिसांनी बखर नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बखर भोसरीतील एका हॉटेलमध्ये वेटर आहे. राणी आणि त्याची ओळख होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. वादातून त्याने पहाटे तीनच्या सुमारास राणीवर चाकुने वार करून खून केला.

लॉकडाऊनमध्येही देहविक्री सुरु ?

शहरात कडकडीत लॉक डाऊन असताना बुधवार पेठेत पोलीस हवालदार व देहविक्री करणाऱ्या महिलेचा पाठोपाठ खून झाला.

लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय बंद असताना बुधवार पेठेत देहविक्री सुरु आहे का ? असा प्रश्‍न या निमीत्त पुढे आला आहे.

प्राथमिक माहितीनूसार बखरने तीचे काही फोटो मोबाईलवर काढले होते. हे फोटो त्याने काही जणांना पाठवले होते. यावरुन त्यांच्यात घटनेच्या दिवशी वाद झाले. यानंतर भर रस्त्यात पोटात धारदार शस्त्र खुपसून तीचा खून करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा