You are currently viewing जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारपेठेत आंबा विक्रेत्यांची गर्दी

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी बाजारपेठेत आंबा विक्रेत्यांची गर्दी

सावंतवाडी
6ते 15 मे या कालावधीत दहा दिवस जनता कर्फ्यू सावंतवाडीत जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेच्या समोरील जागेत रस्त्यावर आंबा बाजार भरला. आंबा विक्रेत्यांनी आज आंबा विक्रीसाठी सकाळी पाच वाजल्यापासूनच जागा अडवण्यासाठी गर्दी केली होती. आता तब्बल दहा दिवस आंबेविक्री करायला मिळणार नसल्याने आणि ते वाया जाणार आहेत त्यामुळे आंबा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंबा बाजार भरवला. आंब्याचे दर तब्बल शंभर ते दीडशे रुपयांनी कमी झाले होते. अवघ्या दोनशे ते दीडशे रुपयाने डझन आंबे आज सावंतवाडी बाजारपेठेत मिळत होते. जनता कर्फ्यूचा परिणाम असा आंबा विक्रेत्यांवर झाला होता आंबा खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पाहायला मिळत होती तसेच बाजारपेठेतही गर्दी होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − ten =