द्रोणकाव्य

द्रोणकाव्य

प्रतिबिंब

त्या चेहऱ्यावरच्या
हास्यात बरंच
सामावलेलं
प्रतिबिंब
मनाचं
दिसे
ते

दिलखुलास लोक
बोलती हास्याने
उघडतील
मनातील
गुपितं
डोळे
ते

ओठी खुले हास्य ते
चेहरा आरसा
मनीचे गुज
न बोलता
सहज
दावी
ते

अंतरंग निर्मळ
खळी गालावर
खुलून दिसे
रूप तिचे
सोज्वळ
भासे
ते

(दिपी)✒️
दीपक पटेकर.
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा