जेष्ठ शिवसैनिक व शिक्षकेतर संघटनेचे नेते बाळ मोरे यांचे निधन

जेष्ठ शिवसैनिक व शिक्षकेतर संघटनेचे नेते बाळ मोरे यांचे निधन

देवरूख

जेष्ठ शिवसैनिक, देवरूख पंचायत समितीचे माजी सदस्य व जिल्हा माध्यमिक कर्मचारी संघटनेचे नेते एकनाथ मारूती तथा बाळ मोरे वय ६२ यांचे आज दुपारी कोरोनावर उपचार सुरू असतानाच निधन झाले.
प्रशासकीय राजवटी नंतर १२ वर्षांनी सन १९९२ ला झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत कसबा गणातून ते शिवसेनेकडून भरघोस मतांनी निवडून आले होते.
त्या नंतर झालेल्या सभापती निवडीत त्यांनी महत्वाचे योगदान दिल्याने सेनेचे पहिले सभापती होणेचा मान सुभाष बने यांना मिळाला होता..
ते कसबा हायस्कूल मधे क्लार्क म्हणून कार्यरत होते. माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. या घटनेमुळे शिवसेना व जिल्हा शिक्षकेतर संघटनेची मोठी हानी झाली आहे.

जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून केले संघटनेचे कार्य प्रेरणादीई होते सर्वांना बरेबर घेवून काम करणेची हातोटी असल्याने या घटनेमुळे संघटनेचा सावली देणारा वट वृक्ष अवेळी उन्मळून पडला. सतत हसतमुख असणारा, कठीण प्रसंगात लिलया मार्ग काढणारा, रात्री बेरात्री कोणत्याही प्रसंगी धावत येणारा हक्काचा माणूस, अनेक लोकांनासह, सतत दुसऱ्याला काहीतरी देण्यासाठी तयार असणारा, अशी अनेक विशेषण कमी पडतील अशा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. बाळासाहेब, संघटनेचा आधार होते. आज तोच गेल्याने खरोखर खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांना माजी मंत्री रविंद्र माने. माजी आम. सुभाष बने. जिल्हा सहसंर्पक प्रमुख राजू महाडीक, शिक्षकेतर संघटनेचे अशोक सप्रे. भाई शिन्दे, आदिंनी शोक व्यक्तकरून श्रद्धांजली वाहली..

प्रतिक्रिया व्यक्त करा