You are currently viewing कोरोनाच्या काळात जुगाराला तेजी…

कोरोनाच्या काळात जुगाराला तेजी…

आजगाव येथील जुगाराचा फड कुणाच्या आशीर्वादाने?…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे बंदोबस्त असताना, लॉक डाऊन सुरू असताना देखील जुगाराला तेजी आलेली आहे. जिल्ह्यात कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आणि मृत्युदर वाढलेला असताना सरकारने निर्बंध लावून देखील जिल्ह्यातील जुगारांचे फड जिथे संधी मिळेल तिथे बसत आहेत.
शिरोडा येथे चोरीछुपे चाललेला जुगाराचा फड शिरोड्यातील जागरूक नागरिकांनी उधळून लावला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरोड्यातील नागरिक बऱ्याच प्रमाणात काळजी घेताना दिसत आहेत. परंतु जुगारी मात्र आपला हट्ट सोडणार नाहीत, त्यांना जुगाराच्या बक्कळ पैशांसमोर कोरोनाची भीती राहिलेली नाही, त्यामुळे शिरोडा येथील बैठक उधळून लावल्यावर हीच मैफिल शिरोड्या शेजारच्या आजगाव येथील परशुराम मंदिराच्या नजीक सुरू झाली आहे.
कोरोनाने सर्वसाधारण नागरिक हैराण झाले असताना व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात बहुतांशी भागात ६ मे पासून १० दिवसांचे कडकडीत लॉक डाऊन जाहीर झाले असतानाही शेकडो लोक एकत्र येऊन जुगाराच्या मैफिली झोडत असल्याने पोलिसांच्या वागणुकीवर संशय येत आहे. नक्की या जुगाऱ्याना कोणाची साथ आहे?

प्रतिक्रिया व्यक्त करा