लसीकरणाच्या ठिकाणी आनावश्यक गर्दी टाळा…

लसीकरणाच्या ठिकाणी आनावश्यक गर्दी टाळा…

– जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खपिले

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उद्या  पासून सूरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करु नये असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे यांनी केले आहे.‍जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय येथे तसेच आठ तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी लसीकरण सत्र सुरु होणार आहे.सध्या सुरु असलेल्या 45 वर्षावरील नागरीकांच्या लसीकरण सत्राव्यतिरिक्त लसीकरण सत्र असणार आहे.

        तसेच COWIN  पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुनच व सत्राची तारीख व वेळ निश्चित करुनच लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहावे.तसेच लसीकरण सत्राच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी. व कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. असे डॉ. महेश खलिपे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, यानी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा