ढगफुटी सदृश्य पावसाने असनियेत घरे व शेती-बागायतीच नुकसान…

ढगफुटी सदृश्य पावसाने असनियेत घरे व शेती-बागायतीच नुकसान…

सावंतवाडी प. स. सभापती मानसी धुरी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी आज परिसराची केली पाहणी…

सावंतवाडी प्रतिनिधी 

सावंतवाडी असनियेत परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने घरे व बागायतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून असनिये-कणेवाडी येथील विलास ठिकार यांच्या घरात दरडीचा मोठा भाग घुसून नुकसान झाले. दरम्यान सावंतवाडी प. स. सभापती मानसी धुरी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी आज या परिसराची पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेआहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा