You are currently viewing डॉक्टरने का केली आत्महत्या..

डॉक्टरने का केली आत्महत्या..

कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा पाहून आपल्याला धडकी भरते आहे. मग या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कोरोना योद्धा डॉक्टरांचं काय होत असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही कोरोना रुग्णांचे जीव जात आहेत. डोळ्यांदेखत किती मृत्यू होत आहेत. त्याचा माणूस म्हणून डॉक्टरांवरही मानसिक परिणाम होतो आहे. अशाच मानसिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या डॉक्टराने कोरोना रुग्णांना मरताना पाहून आपलं आयुष्यही संपवलं आहे.

दिल्लीतील मॅक्स रुग्णालयातील  35 वर्षाचे डॉक्टर विवेक राय  यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. नोव्हेंबर 2020 मध्येच त्यांचं लग्न झालं होतं. त्यांची पत्नी आता दोन महिन्यांची प्रेग्नंट आहे.

डॉक्टर राय हे मूळचे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात  DNB च्या पहिल्या वर्षाचे ते निवासी डॉक्टर होते. गेल्या महिनाभरापासून ते कोरोना ड्युटीवर होते.

माजी IMA प्रमुख डॉ. समीर वानखेडकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. डॉ. समीर वानखेडकर यांनी सांगितलं, “डॉक्टर विवेक यांनी त्यांनी कोरोना काळात शेकडो जीव वाचवले आहेत. आयसीयूमधील कोरोना रुग्णांच्या सेवेत ते होते. दररोज सात ते आठ रुग्णांना ते  सीपीआर, एसीएलएस देत होते. त्यापैकी बहुतेक जण वाचले नाहीत. डोळ्यांदेखत रुग्णांचा मृत्यू होत होता. अशा तणावपूर्ण परिस्थितीत त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट करण्यासारखा कठीण निर्णय घेतला.”

कोरोनाची परिस्थिती हाताळताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर किती मानसिक ताण येतो आहे, हे यातून स्पष्ट होतं. मुलभूत आरोग्य सुविधांमुळे डॉक्टरांमध्ये तणाव वाढला आहे.  त्यामुळे या तरुण डॉक्चरचा मृत्यू सिस्टमद्वारे झालेल्या हत्येपेक्षा कमी नाही आहे. वाईट विज्ञान, वाई राजकारण आणि वाईट शासन”, अशी टीका डॉ. वानखेडकर यांनी केली आहे.

डॉक्टरने एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यात कुणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत. माझं कुटुंब आणि माझे मित्र आनंदी राहोत, इतकंच त्यांनी म्हटलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा