कुडाळ
कुडाळ सांर्गिडेवाडी येथील टेम्पो व्यवसायिक किशोर राणे यांचे आज (रविवारी) निधन झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक राणे यांचे ते बंधू होत.
सांर्गिडेवाडी येथील किशोर राणे हे काही दिवस आजारी होते त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान त्यांचे आज (रविवारी) निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते कुडाळ मध्ये टेम्पो व्यवसाय करत होते त्यामुळे सर्वांचे ते चांगल्या परिचयाचे होते हसमुख आणि सर्वांना सहकार्य करणाऱ्या किशोर राणे यांचे निधन झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.