आय टी इंजिनिअर किरण चौधरी यांचे पुणे येथे निधन…

आय टी इंजिनिअर किरण चौधरी यांचे पुणे येथे निधन…

वेंगुर्ला
वेंगुर्ला कॅम्प गवळीवाडा येथील रहिवासी आणि सध्या कात्रज, वंडर सिटी, पुणे येथे वास्तव्यास असलेले पुणे इन्फोसेस कंपनीचे आय टी इंजिनिअर किरण शिवराम चौधरी वय वर्षे ४२ याचे पुणे येथे आज २ मे २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
वेंगुर्ला येथील बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय मध्ये असताना एन एस यू आय संघटनेचे काम केले होते. तर त्यानंतर युवक कॉग्रेसच्या माध्यमातून ही वेंगुर्ला शहरात त्यांनी अनेक विकास कामे केली होती. सामाजिक कार्याची आवड असल्याने अनेक सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर, युवा संमेलन, शासकीय उपक्रम राबवून जनजागृतीसाठी त्यांनी वेंगुर्ला व पुणे कात्रज येथे सहभाग घेतला होता.

हृराहून्नरी मनमिळावू , हसतमुख व हजरजबाबी स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई,भाऊ, भावजया सासू, सासरे, आत्या असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा