You are currently viewing शहरातील शासकीय इमारती ताब्यात घ्या….

शहरातील शासकीय इमारती ताब्यात घ्या….

 जिल्हाधिकाऱ्यांकडे राजू मसुरकर यांची मागणी

सावंतवाडी

कोरोनामुक्त झालेलं सावंतवाडी शहर मागील एका महिन्यात कोरोनाच हॉटस्पॉट बनत चाललं आहे. मागील वर्षभरात सापडलेल्या रूग्णा़ंच्या निम्मे रूग्ण या एकाच महिन्यात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे. आजच्या घडीला शंभरहून अधिक रूग्ण शहरात आढळले असून आजच्या घडीला ९० हुन अधिक रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे कोव्हीड केअर सेंटर अपुरी पडण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीची भिषणता लक्षात घेत नगरपरिषदेच्या सहकार्यानं शहरातील शासकीय इमारती ताब्यात घ्याव्यात. याठिकाणी कोव्हीड सेंटर, आयसोलेशन वॉर्ड उभारण्यात यावेत जेणेकरून रूग्णांची गैरसोय टळेल‌. आजच्या घडीला कोरोनाच्या लक्षण असलेल्या व लक्षण नसलेल्या काही रूग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. त्यामुळे कुटुंबातील लोकांना याची बाधा होत आहे. दरम्यान, शासकीय इमारती सोबतच शाळा, कॉलेज बंद असल्यानं त्या इमारती, मंगल कार्यालय, हॉल आदीही ताब्यात घ्यावे, बेड उपलब्ध होत नासतील तर गाद्या उपलब्ध करून द्याव्या. लोकांनी बंधन न पाळल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याच मत मसुरकर यांनी व्यक्त केले.

तर लसीकरण केंद्रावर येणारा ताण लक्षात घेता आणखीन एका ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर तातडीनं उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील शासकीय इमारती आपण ताब्यात घेत योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावे अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =