स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे. त्या सुचनेत ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्हाला 31 मेपर्यंत हे करावे लागणार आहे. केवायसी 31 मेपर्यंत करा, अन्यथा बँकिंग सेवा बंद होऊ शकेल, असंही बँकेने म्हटलेय. ग्राहकांना कोणताही त्रास होऊ न देता बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी 31 मे 2021 पर्यंत केवायसी अद्ययावत करणं आवश्यक आहे, असंही बँकेने स्पष्ट केलंय.
आपल्या ट्विटर हँडलवर बँकेने अधिसूचना जारी केली आहे. ग्राहक त्यांचे केवायसी कागदपत्रे त्यांच्या गृह शाखेत किंवा जवळच्या शाखेत सादर करू शकतात. कोरोनामुळे बँकेने ही सुविधा 31 मेपर्यंत वाढविली, म्हणजे आता ज्या खातेदारांचे केवायसी 31 मेपर्यंत अद्ययावत केले जाणार नाही, त्यांची खाती गोठविली जातील.