वेंगुर्ला प्रतिनिधी
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देत महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच वेंगुर्ल्या तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रा.वैभव खानोलकर यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र शिक्षक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या शिक्षक कोविड योध्दा सन्मान या कार्यक्रमात जि.प.अध्यक्षा सौ.समिधा नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आत्माराम बागलकर गुरूजी, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, सोमनाथ टोमके , शिक्षक परिषदेचे किशोर सोनसुरकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर, ता.चिटनीस समीर कुडाळकर, वेतोरे सरपंच राधिका गावडे, आडेली सरपंचा समिधा कुडाळकर, खानोली सरपंचा प्रणाली खानोलकर, जेष्ठ नेते बाळा सावंत, बाबा राऊत, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, शैलेश जामदार, कमलाकांत प्रभु इत्यादी उपस्थित होते .
प्रा.वैभव खानोलकर हे खानोली गावचे सुपुत्र असुन महाराष्ट्रात त्यांची उपक्रमशील अध्यापक, उत्कृष्ट सुत्रसंचालक अभ्यासु वक्ता, दशावतार अभ्यासक अशी वेगळी ओळख आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्र, गोवा राज्यामध्ये कार्यरत असतात. आपल्या कार्यातुन विविध क्षेत्रात ठसा उमटवणा-या प्रा.खानोलकर यांच्या निंबधाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे अशा या व्यक्तीमत्वाला जवळपास ८० राज्यस्तरीय १८ जिल्हास्तरीय आणि ०२ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत केले गेले असुन विविध राज्यस्तरीय स्पर्धेचे ते प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत.
सत्काराला उत्तर देताना प्रा.खानोलकर यांनी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग व शिक्षक परिषद सिधूदुर्ग चे आभार मानत आपण माझा केलेला सन्मान हा मला सदैव प्रेरणा देणारा तर ठरेल त्याच बरोबर तो आपल्या सर्वाचा आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.