कुडाळ :
सद्य:स्थितीत वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळ व भौतिकोपचार महाविद्यालय कुडाळ च्या वतीने 50 खाटांचे मोफत कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे ठरविले आहे. त्याचा पहिला टप्पा 25 खाटांचे नि:शुल्क कोविड केअर सेंटर तयार केले असून, या कोविड केअर सेंटर चा उद्घाटन समारंभ आज शनिवार दिनांक 1 मे 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री मान.नाम. श्री. उदय सामंत साहेब यांच्या शुभहस्ते तसेच खासदार मान.श्री. विनायक राऊत, आमदार मान.श्री. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकीतून जे निस्वार्थी, निरपेक्ष हेतूने नि:शुल्क कोविड केअर सेंटर सुरु करुन रुग्णाचे प्राण वाचविण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, या त्यांच्या कार्यात सहभागी होण्याच्या उदात्त हेतूने “कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षक कलामंच” यांच्या वतीने प्राथमिक मदत म्हणून या कोविड सेंटरला जिल्हयाचे पालकमंत्री मान.नाम.श्री. उदय सामंत, खासदार मान.श्री. विनायक राऊत, आमदार मान.श्री. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वॉशिंग मशीन देण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक कला मंच च्या वतीने श्री. विजय सावंत, संजय गावडे, धोंडू रेडकर, राजाराम कविटकर व महेश गावडे हे उपस्थित होते. पुढील काळात या केअर सेंटर करीता वैद्यकीय उपकरणे तसेच जीवनावश्यक वस्तू दिली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षक कलामंच च्या वतीने सांगण्यात आले. या कलामंचाने सामाजिक जाणिवेतून केलेल्या मदतीबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थचे चेअरमन श्री. उमेश गाळवणकर व सामाजातील मान्यवर व्यक्तींनी त्यांचे आभार मानले आहेत.