कुडाळ :
महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढता करोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या कोरोन केअर सेंटरचे १ मे २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री नाम. उदय सामंत यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, संदेश पारकर, वंदना खरमाळे(प्रांत), अमोल पाठक (तहसीलदार, कुडाळ), विकास कुडाळकर, डॉक्टर खलीपे (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉक्टर संदेश कांबळे (जिल्हा लसीकरण अधिकारी), डॉक्टर संजय निगुडकर, अतुल बंगे, राजन नाईक, अमरसेंन सावंत, नागेंद्र परब, संतोष शिरसाट, व इतर मान्यवर उपस्थित होते. बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या कोरोना केअर सेंटर च्या या सेवेबद्दल उपस्थित मान्यवर यांनी समाधान व्यक्त केले.
हे कोव्हिड केअर सेंटर सर्वांसाठी नि:शुल्क खुले करून दिले जाणार आहे. हे केअर सेंटर सर्व सामाजिक, शारीरिक व आरोग्यविषयक खबरदारीच्या उपाय योजना करून रुग्ण सेवेसाठी तत्पर असणार आहेत, अशी माहिती उमेश गाळवणकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियुषा प्रभूतेंडोलकर हिने केले.