You are currently viewing स्मृती

स्मृती

तुझ्या गत स्मृतींना,
नसत्या जपल्या असत्या कधी मनात.

कुठेतरी जाणीव आहे,
तुझ्या प्रेमाची त्या हरवलेल्या क्षणात.

तू ठोकरलस जाणतेपणी,
मी अज्ञानी बनून गेलो त्यात वाहत.

तू तिथेही हरलीस सहजच,
मी ते ही होतो अगदी हताशपणे पाहत.

तू धावलीस, उंच झेपावलीस,
मी माझे डोळे रित्या आभाळाकडे रोखले.

तुझी झेप शेवटी गगनी विसावली,
माझे भरलेले नेत्र तिथेच आपोआप सुकले.

तू आजही डोळ्यांच्या पल्याड,
अगदी तेव्हा होतीस तशीच अदृश्य.

मी आठवणी सांभाळल्या तुझ्या,
कधी रागात तर कधी प्रेम सदृश्य.

(दिपी)✒️
दीपक पटेकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा