देवगड
बाँबशोधक नाशक पथकाची देवगड स्थानकात अचानक एन्ट्री झाली अन् प्रवाशी व नागरिकांमध्ये घाबरगुंडी उडाली अखेर त्यांची नियमित तपासणी असल्याचे समजल्यानंतर सर्वांनीच उसासा सोडला.लॉकडाऊन काळात सकाळच्या सत्रात गजबजाट असतानाच सिंधुदुर्ग बाँब शोधक नाशक पथकाची गाडी अचानक एस्टी स्थानक परिसरात येते.
गाडीतील श्वान, मेटल डिटेक्टर घेवून कर्मचारी उतरून संपुर्ण परिसराची तपासणी सुरू करतात या प्रकाराने स्थानकामधील प्रवाशी नागरिक काही काळ गोंधळून गेले. मनात भिती येवून प्रश्न पडला की बाँब ठवलाय की काय? मात्र तपासणीची पुर्ण झाल्यानंतर कळते की जिल्ह्यातील महत्वाचा ठिकाणी नियमित करीत असलेली तपासणी आहे.हे समजताच सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.