You are currently viewing सेवानिवृत्त गटविकास अधिकारी अरविंद शिरसाट यांचे निधन

सेवानिवृत्त गटविकास अधिकारी अरविंद शिरसाट यांचे निधन

कुडाळ
कुडाळ शहरातील सेवानिवृत्त गटविकास अधिकारी अरविंद आनंद शिरसाट (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पत्नी, मुलगे मिलिंद व संदेश, दोन विवाहित मुली, भाऊ, बहिण, वहिनी, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांनी गटविकास अधिकारी म्हणून कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, कणकवली या ठिकाणी काम केले. चार दिवसापूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने बेळगाव येथे उपचारासाठी दाखल केले होते. आज गुरुवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =