You are currently viewing जुगाऱ्यांचा बैठकांकडे कल वाढतोय..

जुगाऱ्यांचा बैठकांकडे कल वाढतोय..

*एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा भय वाटतोय.*

सिंधुदूर्ग :

कोरोनाच्या महामारीत जिल्हा होरपळून निघाला आहे. प्रत्येकजण स्वतःकडे कोरोना तर झाला नाही ना या संशयाने पाहत आहे, दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण दहा पेक्षाही जास्त आहे म्हणजे सर्वसाधारण कोरोना ग्रासित रुग्णांच्या 8 ते 10% रुग्ण हे दरदिवशी शासकीय आकड्यानुसार मयत होत असताना, सरकारकडे कोरोनाचा आकडा कमी करण्याचे आव्हान असताना जिल्ह्यात बेकायदेशीर रित्या सुरू असलेले जुगारासारखे धंदे मात्र दिवसारात्री जोरदार सुरू  असून शेकडो लोक कोणतीही बंधने न पाळता एकत्र येऊन जुगार खेळत असल्याने कोरोनाचा प्रसार होण्याचाच धोका सर्वात जास्त आहे.

कणकवली नागवे रोड रेल्वे ब्रिजखाली वागदे नदीच्या पलीकडे जुगाराची जोरदार बैठक सुरू आहे. शनिवार,रविवारी ५० पॉईंट्स रमी खेळत जुगाराचा बादशहा बनलेला बस चालविणारा मोरजेचा नितेश ही बैठक चालवीत आहे. मटका व्यवसाय, व जुगाराच्या मोठमोठ्या तकशीम यांच्या जोरावर करोडपती झालेला नितेश कणकवली शहरापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा जुगाराच्या बैठका घेत आहे.

जुगाराचा दुसरा बादशाह दात पडक्या आप्पा याची तरदुपारी २.०० वाजल्यापासून कट्टा मालवण येथील राणे महाराज मठाजवळील हनुमान मंदिर नजीक बैठक सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असताना देखील ही बैठक कशी काय सुरू? असा प्रश्न कट्टा येथील सुजाण नागरिकांना पडलेला आहे.

फोंडा येथील पारावरचा विठ्ठल म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठलाची सकाळपासूनच फोंडयात जुगाराची बैठक सुरू असून यांना स्थानिक खाकीच्या शिलेदारांचा आशीर्वाद आहे की खकितील मोठ्या धेडांचा आशीर्वाद आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे.

लोकांचा जमाव होऊ नये, बाजारपेठेत गर्दी होऊ नये, विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते असे निर्बंध सर्वसामान्य नागरिकांवर लादले जात असताना कोरोनाचे संकट फक्त जुगाराच्या बैठकांमध्येच येत नाही का? की कायदेशीर रित्या पोलीस प्रशासनाने जुगाराच्या बैठकांना कोरोना वाढीसाठी आमंत्रणच दिले की काय असा प्रश्न आज सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे जे या जुगाराच्या बैठका दिवसाढवळ्या भर रस्त्यात बसलेल्या पाहत आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गैरधंद्यांकडे आणि त्यातून पसरणाऱ्या कोरोनाच्या महामारीकडे गांभीर्याने पाहणार आहेत का?

प्रतिक्रिया व्यक्त करा