You are currently viewing सातार्डा गावात वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निरजंतुकीकरण

सातार्डा गावात वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निरजंतुकीकरण

संजू विरनोडकर टिमचे सहकार्य

गेल्या महिन्याभरात सातार्डा गावात कोविडचा प्रादुर्भाव बराच वाढला आहे. गावातील सरपंच, पोलीस पाटील,
ग्रामपंचायत सदस्य कोविड बाधित आढळल्याने गावात चिंता व्यक्त होत होती. सद्यस्थितीत गावात २४ रुग्ण सक्रिय असून, सात रुग्ण गावातच होम आयसोलेशनमध्ये आहेत.
त्यामुळे गावात जनजागृती करण्याची आवश्यकता होती. तसेच निर्जंतुकीकरण करणे आवश्यक होते. याबाबत पत्रकार संजय पिळणकर व भाजपचे कार्यकर्ते सागर उर्फ गोविंद प्रभू यांनी सातार्डा ग्रामसेवक, तहसीलदार यांच्याकडे गावातील सरपंच व पोलिस पाटील पॉझिटिव्ह असल्याच्या परिस्थितीबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्याचाच एक भाग म्हणून रविवारी संपुर्ण गावात ऑटोरिक्षाने गावातील कोविडच्या सद्यस्थितीतील परिस्थितीबाबत लाऊडस्पीकरवरून माहिती देण्यात आली होती. तर ग्रामसेवक सोमा राऊळ यानी संजू विरनोडकर यांच्याशी संपर्क करून सातार्डा मेसवाडी, बांधवाडी, आरोंदेकरवाडी, सातार्डा तीठा, घोगळवाडी, जाधववाडी, मुंबार्डेवाडी, देऊळवाडी येथील कोविड बाधित व्यक्तींच्या संपूर्ण घरांचे व सातार्डा बाजारपेठेत ग्रामपंचायतच्या पुढाकारातून निर्जंतुकीकरण करण्यात आले.यावेळी संजू विरनोडकर टिंमचे बंट्टी जामदार,सागर मळगावकर, ज्ञानेश्वर पाटकर व टीमला भाजपचे सामाजिक कार्यकर्ते सागर प्रभू व पत्रकार संजय पिळणकर यांनीही निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करून मदत केली.यावेळी ग्रामसेवक सोमा राऊळ,लिपिक अशोक जाधव,सदस्य श्रुतिका मांजरेकर, संजना मेस्त्री उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा