You are currently viewing एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट..

एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट..

 

पुन्हा एकदा एका रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे एमआयडीसीत कंपनीला भीषण आग लागली आहे. केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आग पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

 

आज सकाळी 11 वाजता ही दुर्घटना घडली आहे. लोटे एमआयडीसीतील एम आर फार्मा केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे.  स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाच्या भीषण आवाजाने कंपनीच्या आजूबाजूचा परिसर हादरला असून अनेक कंपन्यांच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहे. धुराचे लोट हे तब्बल 10 किमी अंतरावरून दिसून येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. या दुर्घटनेत अद्याप मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे.[vsrp vsrp_id=”” class=””]

एमआयडीसी मधील लोटे अपघाताची सहावी घटना आहे.  मागील महिन्यात 20 मार्च रोजी लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोटाची तीव्रता जास्त होती. स्फोटात 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 3 जण जखमी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा