केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलीय. यात राज्यातील अनेक रस्त्यांच्या दुरुस्ती, रुंदीकरणाच्या कामाचाही समावेश आहे. या कामासाठी मोठा निधी मंजूर झाल्यामुळे विविध जिल्ह्यांमधील रस्ते प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रातील ज्या 7 जिल्ह्यांमधील रस्त्यांच्या कामासाठी नितीन गडकरी यांनी निधी मंजूर केलाय त्यात नाशिक, पुणे, वाशिम, सोलापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि लातूरचा समावेश आहे. नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याने या जिल्ह्यांमधील अनेक रस्त्यांची दुरुस्ती, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील वाहतूक अधिक वेगवान होईल.