You are currently viewing चलो जलाए दिप वहाँ,जहाँ अभी भी अंधेरा है! थँक्स टू अरविद कुडतरकर..

चलो जलाए दिप वहाँ,जहाँ अभी भी अंधेरा है! थँक्स टू अरविद कुडतरकर..

काल बुधवारी ओरसमधील शासकीय सेवेत असलेल्या माझ्या एका मित्राचा फोन आला, “पार्सेकर, एका विधवा बाईला मदत करावयाची आहे..तिचे खाण्यापिण्याचे हाल असून ती आंधळी आणि निराधार आहे.आपण अगोदर खात्री करा आणि तुमच्या पातळीवर त्या बिचारीला मदत करा. मी तीचा संपर्क नंबर आणि नांव पाठवतो.”
मी त्या माझ्या मित्राला म्हणालो..काळजी करू नका उद्या संध्याकाळपर्यंत तिच्या घरी मदत पोहचलेली असेल.
ती आमची अंध भगीनी जिथ रहाते त्या गावाचं नावं सोनाळी, वाणीवाडी, वैभववाडी.
गेल्या लाँकडाऊन आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे अनेक विषय हाताळत असल्याने मला तिच्यापर्यंत मदत पोचविणे काही कठीण नव्हत. मी शांतपणे विचार केला..आणि माझ्या डोळ्यासमोर पहिलं नांव आलं आमचे मित्र अरविंद कुडतरकर. प्रमोद जठार यांच्या पहिल्या निवडणूकीत परिचय झाला आणि अगदी आमचे कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. आमच्या बरोबर दोन वर्षे ते M.S.W.. ला पण होते. त्यामुळे गेली बारा वर्षे त्यांचा सेवाभाव अगदी जवळून बघितला…अनुभवला. मी त्यांना फोन करुन त्या अंध भगीनीचा विषय सांगितला..
आमचे सेवाभावी मित्र कुडतरकर म्हणाले..मी तातडीने चौकशी करतो आणि तीला आवश्यक मदत देण्याची व्यवस्था करतो.. मी त्यांना म्हणालो, “मला जरा तुमचा अकांऊट नंबर पाठवा..त्यावर ते म्हणाले, अहो, थोडं हे पुण्याचे काम करण्याची संधी आम्हाला पण द्या.पैशाचं काही बोलू नका.
कुडतरकर यांनी त्या भगीनीला फोन लावला सर्व माहिती घेतली तिला घरातलचं किराणा हवं होत..घरातल अन्नधान्य संपल्याने तिची उपासमार होत होती.
कुडतरकरांनी रुपये ३१००/ चा किराणा घेऊन धो धो पावसात घरं गाठलं.घरी जाण्यासाठी थड रस्ता पण नाही. इंदिरा आवास योजनेच्या घरकुलात ती अंध पस्तीस वर्षीय निराधार महिला एकटीच रहाते. कुडतरकरांनी हे द्रुष्य पाहून ते भावनिक झाले.फोनवर मला ते जाणवत होतं.
मी त्या आमच्या अंध भगिनींला फोन केला.तिची सर्व माहिती घेतली व तिला विचारलं की “ताई,तुझ्या मदतीसाठी तुझे नांव व संपर्क नंबर मी जाहीर केला तर चालेल का?  त्यावर ती भगिनी म्हणाली “माझी काही हरकत नाही भाऊ,मला खरच खूप गरज आहे मदतीची.या कोरोनामुळे कुणाकडे मदत मागायला जाता पण येत नाही..तुम्ही माझे नांव व फोननंबर द्या…
मित्रानो,तशी घटना अगदीच छोटी आणि केलेली मदतही, पण आताची परिस्थिती पहाता समाजातील प्रत्येक सधन घटकांनी स्वतःपुरता विचार न करता रंजल्या गांजलेल्याना मोठ्या मनाने आधार दिला पाहिजे कुडतरकरांसारखे सेवाव्रती हे काम करत आहेत.आपणही या कामात सहभागी व्हा ही विनंती.
त्या आमच्या अंधभगीनीचे नांव आहे श्रीमती रितू सुधीर जोशी मोबाईल नंबर 9860944974.ज्यांना कुणाला मदत करावयाची आहे त्यांनी त्या भगीनीला संपर्क करावा…
या कोरोनाच्या महाभयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण जीथ अंधार असेल तिथ एखादी पणती लावू.रंजल्या-गांजल्याना हात देवू….
अँड.नकुल पार्सेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा