You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव जल्लोषात साजरा :

सावंतवाडी

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची प्रथा आजही आपल्या भारतात प्रचलित आहे. ही परंपरा पुढे चालवण्यासाठी व आजच्या आपल्या भावी पिढीलाही या सणांचे महत्त्व समजावे याकरिता आज स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहात सर्व तयारी करण्यात आली. शालेय सहा. शिक्षिका सौ. अश्विनी जोशी, सौ. निकिता मडगावकर‌ व कु. विनायकी जबडे यांनी कार्यक्रमाकरीता रंगीत पडदे व फुलांच्या हारांनी सजावट केली. सर्वांनी मिळून गणपतीची पूजा केली. गणपतीला दुर्वा व लाल जास्वंदीची फुले, तसेच रंगीत फुले वाहिली गेली. गणपतीला मोदकांचा, बुंदी व पंचफळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच सहा. शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना गणेशोत्सव या सणाबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर इयत्ता ३ री व ५ वी च्या विद्यार्थीनींनी मिळून ‘ गजानना श्री गणराया’ हे गीत, तर इयत्ता २ री च्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी ‘ माझ्या पप्पांनी गणपती आणला ‘,अशी अनुक्रमे दोन गीते सादर केली. त्यासाठी शाळेतील संगीताचे शिक्षक श्री. कपिल कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. त्यानंतर सहा. शिक्षिका सौ. सुषमा पालव यांनी विद्यार्थ्यांकडून विश्र्वप्रार्थना म्हणून घेतली. इयत्ता १ ली ची विद्यार्थिनी ‘ आद्या कुंभार ‘ हिने संस्कृत भाषेत गणपतीचे स्तोत्र सादर केले. हार्मोनियमच्या तालावर सर्वांनी गणपतीची आरती म्हटली. ‘ श्रियांश सावळ’ या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याने हार्मोनियम वादन केले. त्यानंतर सर्वांनाच तीर्थ व बुंदीचा प्रसादाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोड पदार्थ म्हणून शेवयाची खीर देण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या या कार्यक्रमाने शाळेतील वातावरण अगदी प्रसन्न झाले. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये अतिशय जल्लोषात गणेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =